मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचलित
न्यू हायस्कूल, वरुड (घा), ता. जाफराबाद, जिल्हा – जालना
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ (MSPM) ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील एक अग्रगण्य, नावाजलेली आणि सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक संस्था आहे. ग्रामीण भागातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम आणि सर्वांगीण शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने दिनांक १ सप्टेंबर १९५८ रोजी दूरदृष्टीचे नेते तथा माजी मंत्री मा. विनायकराव पाटील यांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली.
“शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे” या विचारधारेवर चालणाऱ्या या संस्थेने गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानज्योत प्रज्वलित ठेवली आहे. शिस्त, संस्कार, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या मूल्यांवर आधारित शिक्षण देत संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी गावातच उपलब्ध व्हावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल व्हावे आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे या पवित्र उद्देशाने दिनांक १५ जून १९६६ रोजी वरुड (घा.) येथे न्यू हायस्कूलची स्थापना करण्यात आली.
स्थापनेपासून आजपर्यंत या विद्यालयाने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण, प्रशासन, पोलीस विभाग, सैन्यदल, आरोग्य सेवा, उद्योग, कृषी, सामाजिक क्षेत्र तसेच व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून समाजात आपला ठसा उमटवत आहेत.
न्यू हायस्कूल, वरुड ही केवळ एक शाळा नसून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे एक प्रेरणास्थान आहे. शिस्तबद्ध वातावरण, अनुभवी शिक्षकवृंद, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा विकास, नैतिक मूल्यांची जपणूक आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांमुळे शाळेने परिसरात विशेष नावलौकिक मिळवला आहे.
या विद्यालयामुळे वरुड व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून अनेक कुटुंबांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम, स्वावलंबी आणि यशस्वी नागरिक घडविण्याचे महान कार्य ही संस्था सातत्याने करत आहे.
hmwarudgh@mspmmandal.in

